अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्राचे ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे भ्रष्टाचार उघड करण्यासाठी कोल्हापुरला निघालेल्या भाजप नेते किरीट सोमय्या यांना कराड पोलिसांनी ताब्यात घेतल.
यानंतर आता किरीत सोमय्या यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेत चांगलाच संताप व्यक्त केला. सोमय्या यांच्या आरोपांना आता ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं आहे.
सोमय्या यांच्या आरोपांवर मंत्री मुश्रीफ म्हणाले की, “माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वास्तविक माझ्यावर व माझ्या कुटुंबियांवर चुकीची खोटी तक्रार करून आरोप केलेले आहेत.
तसेच त्यांनी आरओसीमधून मिळवलेली कागदपत्रे केंद्रीय तपास यंत्रणांकडे दिलेली आहेत. यापूर्वीही केंद्रीय तपास यंत्रणेकडून छापा, चौकशी झालेली आहे.
दरम्यान, तपास यंत्रणा ज्यावेळेस चौकशी करतील त्याचे योग्य उत्तर आम्ही देऊन त्यांना सहकार्य करूच. परंतु; किरीट सोमय्या यांची ही स्टंटबाजी कशासाठी?
त्यांना हा अधिकार कोणी दिला? कारण त्याना एक सवयच लागली आहे की तक्रार करायची व तिथे जाऊन पर्यटन करून प्रसिद्धी मिळवायची.” “या सगळ्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील मास्टरमाईंड आहेत.
मला त्रास देण्यासाठी, मला कुठेतरी रोखण्यासाठी हे सगळं सुरु आहे. चंद्रकांत पाटील यांनी पुरुषार्थाप्रमाणे वागावे आणि लढावे.” “चंद्रकांत पाटील हे भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात भाजप भुईसपाट झाला, हे भुईसपाट कुणामुळे झालं, तर मुश्रीफांमुळे, त्यांनी मला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली होती. पण मी त्यांना ठणकावून सांगितलं, पवार एके पवार.
त्यांनी माझ्यावर इन्कम टॅक्सची धाड टाकली, आता महाविकास आघाडी प्रबळ झाली आहे. त्यांच्यासमोर भाजपला यश मिळत नाही, त्यामुळे हे सगळं सुरु आहे, असं हसन मुश्रीफ म्हणाले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम