अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट सापडली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.
बोठे याला पोलिसांनी शनिवारी हैदराबाद येथून अटक केली. यावेळी पोलिसांनी बोठेच्या अंगाची झडती घेतली असता त्याच्या खिशात त्यांना सुसाईड नोट मिळून आली. नगर पोलिसांनी शनिवारी हैदराबाद येथून बोठेला अटक केली. यावेळी हैदराबाद येथे घेतलेल्या झडतीमध्ये पोलिसांना सुसाईड नोट सापडली.
सुसाईड केल्यानंतर माझ्या कुटुंबियांना संपर्क करा असा उल्लेख या नोटमध्ये आहे. बोठे याला हैदराबादमधून अटक केल्यानंतर त्याला पारनेर पोलिस ठाण्यात ठेवण्यात आले. काल रविवारी बोठे यास पारनेर न्यायालयात हजर केले. यावेळी पोलिसांनी न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी केली.
गेल्या तीन महिन्यांपासून बोठे का फरार होता. त्याला तीन महिन्यात कोणी मदत केली. तसेच रेखा जरे यांची हत्या त्याने का केली, याचा उलगडा अजून व्हायचा आहे. त्यासाठी पोलिस कोठडीची मागणी सरकारी वकील सिध्दार्थ बागले यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने बोठेला ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.
बोठेसह त्याला मदत करणारे आंध्र प्रदेशातील जनार्दन चंद्राप्पा, राजशेखर चाकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरीफ व महेश वसंतराव तनपुरे (रा. नवलेनगर, सावेडी, अहमदनगर) यांनाही अटक केल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. पी. अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी (रा. हैदराबाद) ही महिला आरोपी पसार झाली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|