अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पोटनिवडणुकीतील विजयाचा मार्ग मोकळा व्हावा यासाठी भवानीपूरचे आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी पदाचा राजीनामा दिला आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत नंदीग्राममध्ये बॅनर्जी यांचा पराभव झाला होता. त्यामुळे त्यांना नियमाप्रमाणे सहा महिन्यांत विधानसभेची निवडणूक जिंकणे अनिवार्य आहे.
तरच त्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर राहू शकतील. तृणमूलचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले, ममतांच्या निवडणुकीबद्दलचा निर्णय पक्ष घेणार आहे.
त्याबद्दल मी काहीही सांगू शकत नाही. परंतु दीदींसाठी राजीनामा देण्यात मला आनंद आहे. त्यामुळे मी भवानीपूर मतदारसंघाचा राजीनामा देत असल्याचे चटर्जी यांनी म्हटले आहे.
विधानसभेच्या अध्यक्षांनीदेखील चटर्जी यांनी स्वेच्छेने राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले. पक्षाने मात्र त्यावर स्पष्ट भूमिका मांडली नाही.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम