अत्यावश्यक वाहतुकीस पास लागेल कि नाही ? वाचा काय म्हणाले राज्याचे पोलीस महासंचालक…

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :- राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला नाही. तर कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आपण राज्यात संचारबंदी लागू केली आहे.

कुणालाही विनाकारण त्रास देणार नाही :- त्यामुळे जनतेने सहकार्य करावं. आम्ही कुणालाही विनाकारण त्रास देणार नाही याची हमी देतो, पण जाणूबुजून संचारबंदीचा भंग करून आम्हाला लाठीचा वापर करण्याची वेळ आणू नका, असं आवाहन राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी केलं आहे.

अत्यावश्यक कामास निघणाऱ्या नागरिकांना दिलासा :- सार्वजनिक मालमत्तेची नासधूस होत असेल तर बळाचा, लाठीचा वापर होईल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. तसेच अत्यावश्यक वाहतुकीस पासची गरज नसल्याचे सांगत पांडे यांनी अत्यावश्यक कामास निघणाऱ्या नागरिकांना दिलासा दिला आहे.

विनाकारण फटकवू नका :- राज्यात 144 कलम लागू होत आहे. त्यामुळे 5 पेक्षा जास्त लोकांनी घराबाहेर पडू नये. जर खरोखर काम असेल आणि कोणी बाहेर पडलं असेल तर हरकत नाही. जाणूनबुजून नियमभंग केला नसेल तर विनाकारण फटकवू नका.मात्र, जाणूनबुजून नियमांचा भंग करून आमच्यावर लाठी वापरण्याची वेळ आणून नका, असं पांडे म्हणाले.

लोकांच्या सहकार्याची गरज लागणार :- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी व कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. यात पोलीस दलावर सर्वात मोठी जबाबदारी असणार आहे आणि त्यासाठी आम्ही तयार आहोत.यात आम्हाला लोकांच्या सहकार्याची गरज लागणार आहे.

नाहक कुणाला त्रास होणार नाही :- नियम व अटी लोकांना आता माहीत झाले आहेत. त्यामुळेच त्याचे पालन व्हावे अशी अपेक्षा असून पोलिसांकडून नाहक कुणाला त्रास होणार नाही, याची हमी मी देतो, असेही पांडे म्हणाले.

 ८१ टक्के पोलिसांचे लसीकरण पूर्ण :- जगभर पसरलेल्या कोरोना महामारीशी आपल्याला लढा द्यायचा आहे. हा लढा आपण तुमच्या सहकार्याने यशस्वी करूया. पोलीस देखील यासाठी सज्ज आहेत. राज्यातील एकूण ८१ टक्के पोलिसांचे दोन्ही टप्प्यातील लसीकरण पूर्ण झाले आहे.

नियम मोडले तर लाठीचा वापर :- मास्क वापरा, हात सॅनिटाईझ करा. शक्यतो अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका. आपण आपली स्वतःची काळजी घ्या. कलम १४४ लागू होणार असून ५ पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र जमू शकत नाहीत.मात्र, नियम मोडले तर लाठीचा वापर केला जाईल, असा इशारा देखील पांडे यांनी विनाकारण फिरणाऱ्यांना दिला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News