अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांच्या बेबंदशाहीला कंटाळून १९ फेब्रुवारी रोजी एका शेतकर्याने उस पेटविल्यानंतर आणखी एका शेतकर्याने आपल्या शेतातील उस पेटवून दिला. घाम गाळून कष्ट घेणार्या शेतकर्याला हाती आलेलं पीक पेटवून देताना काय वेदना झाल्या असतील.
अनेक राज्य आणि राष्ट्रांचा भाषणप्रवास करणारे मुख्यमंत्री किमान एकदा तरी मुळा साखर कारखान्याकडून होणार्या छळावर बोलणार का असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
तर दुसरीकडे मी त्यांचा राजकीय विरोधक असल्यानेच मुळा सहकारी साखर कारखाना माझ्यावर अन्याय करत असल्याचा आरोप करत ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख ,
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली मुळा सहकारी साखर कारखाना चालवला जात असून अनेकदा ऊस नोंद करायला जाऊनही नोंद घेतली नसल्याच्या निषेधार्थ ऋषिकेश शेटे या शेतकऱ्याने आपल्या दीड एकर ऊसाला आग लावली.
ही घटना नेवासा तालुक्यातील हनुमानवाडी येथे घडली आहे. दरम्यान आता या ऊस ज्वलन आंदोलनावरून सोशल मीडियावर सत्ताधारी विरुद्ध विरोधक आमने सामने आले आहे.
साखर कारखाना व्यवस्थापणाने हे आरोप फेटाळले असून तारखेतील घोळ असल्याने हा वाद निर्माण झाला असल्याबाबत पुरावे सोशल मीडियातून व्हायरल केले आहेत.
ऋषिकेश शेटे यांनी ऊस जाळण्याचा स्टंट केला असून ऊस जाळण्यापूर्वीच तो तोडला असल्या बाबत एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
तर शेतकऱ्याने पेटवलेल्या ऊसाचा व्हिडीओ राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडेल वरून शेअर करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|