अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- गोदावरी कालवे लाभक्षेत्रातील पिके पाण्या अभावी जळून जात असताना लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षाने सिंचन व्यवस्थेचा खेळखंडोबा झाला असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली.
उभी पिके हातातून गेल्यावर आवर्तन सुटणार का? असा संतप्त सवाल भाजपच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केला.
गोदावरी कालव्यांना शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येणार! याकडे शेतकरी डोळे लावून बसले असतांना अद्यापही आवर्तन सुटत नसल्याने लाखो रुपये खर्च करून शेतात उभी असलेली पिके पाण्याअभावी जळू लागली.
लोकप्रतिनिधींच्या सिंचन व्यवस्थेकडे झालेल्या दुर्लक्षामुळे आवर्तन सुटण्यास उशीर झाला. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने पिके जळून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली.
हाती आलेली पिके जळून गेल्यावर शेतीचे आवर्तन सुटले, तर त्याचा फायदा होणार का? असा सवालही त्यांनी केला.
येत्या १३ तारखेला दोन रोटेशन सुटणार असल्याचे सांगितले जात आहे. पिकांना पाण्याची आवश्यकता असताना पिके जळू दयायचे आणि नुकसानीनंतर एकाच वेळी दोन आवर्तने देऊ म्हणून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरू आहे.
मागील सरकारच्या काळात कालवा सल्लागार समितीच्या बैठका मंत्रालयात होतात, म्हणून मोठे आकाडतांडव केले होते.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|