अपवाद वगळता डॉक्टर हे केवळ पैसा कमवण्यासाठी “माल प्रॅक्टिस” ….

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- कोपरगावात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना त्यांच्यावर उपचार करणारे काही अपवाद वगळता बाकी डॉक्टर हे केवळ पैसा कमवण्यासाठी “माल प्रॅक्टिस” करत असल्याची प्रखर टीका प्रदेश भाजपचे कार्यकारिणी सदस्य अॅड. रवींद्र बोरावके यांनी केली.

त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. काही मेडीकल प्रॅक्टीशनर घेऊ लागलेत. काही डॉक्टर सेवावृत्तीने हे काम करत आहेत.

पण काही डॉक्टर मात्र लुबाडत आहेत. मागच्या कोरोनाच्या वेळी हीच मंडळी दवाखाने बंद करून २-३ महिने बाहेरगावी निघून गेले होती.

ते डॉक्टर आता कोविड रुग्ण भरती करून लाखो रुपये कमावताना दिसताहेत. जागतिक आरोग्य संघटनेने व आरोग्य विभागाने रेमडेसिवीरची गरज नसताना वापरू नका,

असे सांगूनही काही मंडळी त्याचाच वापर करत आहेत. त्याचे दुष्परिणाम आता सार्वत्रिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe