अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- वांबोरी शिवारात शेतीच्या वादातून दोन सख्ख्या भावात झालेल्या बाचाबाची आणि मारहाणी प्रकरणी पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या घटनेबाबत आलेला पहिल्या फिर्यादीत महिलेने म्हंटले आहे की, 20 मे रोजी दुपारी 04/30 वा.चे सुमारार फिर्यादी महिलेचा पती माणिक, मुलगा विकास असे त्यांचे शेताचे बांधावर पाहणी करत असताना बांदावरील गवत ,
झुडपे ही जाळुन टाकलेली दिसल्याने महिलेने तेथे असलेल्या तिचा दीर उत्तम भानुदास सत्रै व जाव आशाबाई उत्तम सत्रे यांना तुम्ही बांधावरील गवत व झुडपे का जाळलीस ? अशी विचारणा केली असता त्यांनी फीर्यादी महिलेचा पती व मुलगा यांना शिवीगाळ करुन तुम्ही आमचे नादी लागु नका,
नाहीतर तुमचे कु – हाडीने तुकडे करुन टाकीन असे म्हणुन फियादीस काठीने व कु – हाडीचे उलट्या तुंब्याने मारहाण केली, तर दुसऱ्या फिर्यादीत एक 35 वर्षीय महिलेने म्हंटले की,
20 रोजी दुपारी 04/30 वा चे सुमारार फिर्यादी ही त्यांचे वांबोरी शिवारातील शेत गट न 1549 मधील विहीरीचे काठावरील झुडपे तोडत असताना तेथे माणिक भानुदास सत्रे हा आला व फियांदीस झुडपे का तोडली ? असे म्हणाला असता
फिर्यादी त्यांना झुडपाचा पाला विहीरीत पडुन पाणी खराब होत असल्याने मी झुडपे तोडली, असे म्हणाले असता आरोपी हा फिर्यादीस तु कोर्टातुन नांदण्यासाठी आलेली आहे तु चांगली नाही असे म्हणुन तिचा पती उत्तम यांना शिवीगाळ करुन पुतण्या विकास माणिक सत्रे याने लाथाबुक्कयाने मारहाण केली
व माणिक यांनी त्याचे हातातील काठीने फियादीस व पती उत्तम यांना मारहाण केली व तुम्ही आमचे नादी लागलास तर तुमचे सपराचे घर पेटवुन देवुन तुम्हाला ठार मारून टाकू अशी धमकी दिली वगैरे फियादीवरुन गुन्हा रजि दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम