अहमदनगर Live24 टीम, 11 जुलै 2021 :- अलीकडे किरकोळ कारणावरून देखील अनेकदा मोठमोठ्या वादग्रस्त घटना घडतात. अशीच घटना नुकतीच नगर तालुक्यातील टाकळी खातगाव येथे घडली.
यात केवळ गवत घेण्यास विरोध केल्याने दोघांनी एका महिलेस मारहाण करत तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र लांबवले. याबाबत सविस्तर असे की, नगर तालुक्यातील खातगाव टाकळीतील फिर्यादी व त्यांचा मुलगा शेतात काम करत होता.

यावेळी पवार यांचे नातेवाईक गवत घेण्यासाठी आले असता फिर्यादी महिलेने त्यांना गवत घेण्यास विरोध केला. गवत घेण्यास विरोध केल्याचा राग मनात घरून प्रकाश सुभाष पवार व किसन राजाराम पवार यांनी या महिलेस मारहाण केली.
तसेच यावेळी तिच्या गळ्यातील १५ हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. याप्रकरणी पीडित महिलेने एमआयडीसी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश सुभाष पवार व किसन राजाराम पवार या दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम













