अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक घटना : पावसात मोबाईलवर बोलताना वीज अंगावर पडल्याने महिलेचा मृत्यू !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :-  अहमदनगर जिल्ह्याच्या राहाता तालुक्यातील केलवड येथेे वीज अंगावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला आहे. केलवड येथील ताई शिवाजी रजपूत (वय 35) असे या मयत महिलेचे नाव आहे.

सदर महिला घराजवळील शेतात काम करत होती. यावेळी विजा चमकत होत्या. घरात मोबाईल आला म्हणून या महिलेच्या मुलीने पळत जाऊन तिच्याकडे मोबाईल देवुन घराकडे निघाली.

महिलेने मोबाईल सुरू करताच वीज अंगावर पडली. सोमवारी सायंंकाळी 6.45 पूर्वी तिच्या अंगावर वीज पडल्याने गंभीर जखमी झाली. तिच्या नातेवाईकांनी तिला राहाता येेथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता औषधोपचारापूर्वीच ती मयत झाली.

ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून राहाता पोलिसांनी आकस्मात मृत्यू अशी नोंद केली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एस. बी. नरोडे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe