नगर औरंगाबाद रोडवर कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-  भरधाव वेगातील कारचालकाने कारच्या समोर चाललेल्या मोटारसायकलला पाठीमागुन जारोची धडक दिली. या धडकेत मोटारसायकलवर पाठीमागे बसलेली अनिता नानासाहेब चौधरी (वय ५० वर्षे रा.ढवळपुरी ता.पारनेर) या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना नगर औरंगाबाद रोडवरील हॉटेल सुवर्णज्योत जवळ घडली.

याप्रकरणी अज्ञात कारचालकाविरूध्द एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे की, नानासाहेब विठ्ठल चौधरी (वय ५६) व अनिता नानासाहेब चौधरी ( रा.ढवळपुरी ता.पारनेर. हल्ली रा. प्रेमदान हडको,रासनेनगर) हे पती पत्नी दोघेजण त्यांची मोटारसायकल (एमएच १६ बीई २५९२) वरून नगर -औरंगाबाद रोडने जात असताना शेंडी शिवारातील हॉटेल सुवर्णज्योत जवळ पाठीमागून नगरकडे जाणाऱ्या भरधाव वेगात आलेल्या मारूती वॅगनर (एमएच १९ बीजे १२७१)

वरील चालकाने चौधरी यांच्या मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत पाठीमागे बसलेल्या अनिता चौधरी यांचा मृत्यू झाला. याबाबत नानासाहेब चौधरी यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी अज्ञात कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करून संबंधितास ताब्यात घेतले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News