पोलिसांच्या विरुद्ध बातम्या दिल्याने महिलेची पत्रकारांना धमकी !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :-  आम्ही नेवासकर न्यूज पोर्टल व न्यूज २४ टुडे चॅनलने एका पोलिस अधिकाऱ्याच्या व्हायरल झालेल्या क्लीपची बातमी दिल्यामुळे शनिवारी चक्क एका महिलेचा पत्रकारांना धमकीचा फोन आला.

याप्रकरणी संबंधित महिलेविरुद्ध नेवासे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. नेवासे पोलिसात दिलेल्या फिर्यादीत आम्ही नेवासकर न्यूज पोर्टलचे सौरभ संजय मुनोत यांनी म्हटले आहे की, ते दुपारी ४ च्या सुमारास घरी असताना एका अज्ञात मोबाइल क्रमांकावरून एका महिलेचा फोन आला.

तुम्ही नेवासे पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकाऱ्याची बातमी करून का व्हायरल केली, ती तातडीने काढून टाका, अन्यथा तुमचे काय होईल, हे देखील तुम्हाला कळेल, अशी धमकी दिली.

अश्याच प्रकारे न्यूज २४ टुडेचे प्रतिनिधी पत्रकार ज्ञानेश सुरेश सिन्नरकर यांना ही धमकी देण्यात आली. एका पोलिस अधिकाऱ्याची व्हायरल क्लिपची बातमी केल्याने पत्रकारांना बातमी का केली?

अशी धमकी देण्याइतकी या महिलेची मजल कशी व कोणामुळे गेली? संबंधित अधिकाऱ्याचा व या महिलेचे काय संबंध आहेत, याची चौकशी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी करावी, अशी मागणी नेवासे प्रेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष गुरुप्रसाद देशपांडे यांनी केली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe