अहमदनगर Live24 टीम, 11 जुलै 2021 :- बाजारपेठेत आलेल्या महिलेची पर्स अज्ञात चोरट्यांनी पळवली. शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.
पर्समध्ये बारा हजार रुपये किमतीचा मोबाईल व चोवीस हजार पाचशे रुपयांची रोकड होती. भिस्तबाग चौक परिसरातील सप्तशृंगी कॉलनी मध्ये राहणाऱ्या पूनम मुकेश वर्मा या महिला खरेदीसाठी बाजारपेठेत आल्या होत्या.
माेची गल्लीतील एका दुकानात या खरेदी करत असताना त्यांची पर्स चोरट्यांनी पळवले. याप्रकरणी वर्मा यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम