अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये आजकाल जास्तच वाढ झालेली पाहायला मिळत आहे. अत्याचार, छेडछाड, विनयभंग अशा घटना घडू लागल्याने महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.
नुकतेच शहरात एक अशीच एक घटना घडली आहे. गुलमोहर रोड परिसरात राहणाऱ्या एका नोकरदार महिलेच्या थेट घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली.
याप्रकरणी पीडित महिलेने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विलास प्रभाकर साळवे (रा. भिंगार, नगर) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी महिला घरी असताना विलास साळवे त्याच्या दुचाकीवरून फिर्यादी यांच्या घरी आला.
घराच्या बाहेर फिर्यादी यांचे पती उभे होते. साळवे याने त्यांना शिवीगाळ करून घरात प्रवेश केला. तो फिर्यादीला म्हणाला, तुझ्यामुळे माझी नोकरी गेली आहे, असे म्हणत फिर्यादीसोबत गैरवर्तन केले.
शिवीगाळ, मारहाण करत दमदाटी केल्याचे पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस नाईक ए. पी. इनामदार करीत आहेत.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम