अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- गाव गाड्याच्या कारभारात ५० टक्क्यांपेक्षा अधिक प्रमाणात महिला निवडून आलेल्या आहेत. गावाचा कारभार पाहताना शिवाजी महाराजांप्रमाणे राजधर्माच्या पालनासह पुढील पिढीला आदर्श बनवण्यासाठी गावागावात महिलांनी पुढाकार घ्यावा.
प्रशासनावर वचक व पकड ठेवत नागरिकांच्या समस्या सोडवून गावाचा विकास करावा, असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले.
शहरातील कसबा विभागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त नगरसेवक महेश बोरुडे मित्र मंडळ व कसबा परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांना संपूर्ण शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी राजळे बोलत होत्या. अध्यक्षस्थानी खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन मधुकर काटे होते.
यावेळी नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, माजी नगराध्यक्ष हिंदकुमार औटी, माजी उपनगराध्यक्ष बंडूशेठ बोरुडे, भाजप शहराध्यक्ष अजय भंडारी, महिला शहराध्यक्ष ज्योती मंत्री, माजी नगरसेविका सुरेखा गोरे, सोसायटीचे माजी चेअरमन सुभाष बोरुडे, अॅड. सुरेश आव्हाड, युवकचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर, माजी तालुकाध्यक्ष काशीबाई गोल्हार,
खविसंच्या संचालिका सिंधू साठे, सविता मुळे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बाबू बोरुडे, नितीन परदेशी, राजेंद्र उदारे, हरी बोरुडे, शुभम सुपेकर, उमेश केकाण, परशुराम परदेशी, श्रावण थोरात परिश्रम घेतले.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved