कोरोना रोखण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 29 एप्रिल 2021 :- पहिल्या लाटेत कोरोनाचा ग्रामीण भागात प्रभाव कमी होता; मात्र दुसऱ्या लाटेत शहरी व ग्रामीण भागाबरोबरच लहान- मोठ्या गावातही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.

वाढता मृत्यूदर बघता वैद्यकीय यंत्रणा, महसूल, पोलीस प्रशासन काम करत आहेत. तरी लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे मत शिर्डी येथील वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नारायण न्याहाळदे यांनी व्यक्त केले.

याबाबत पत्रकारांशी बोलताना न्याहाळदे यांनी सांगितले, की शिर्डी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील,

उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली नियमांचे पालन न करणाऱ्या दुचाकीस्वारांवर वेळप्रसंगी कारवाई तर कधी गांधीगिरी करत, हात जोडून विनंती केली आहे.

कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गडद होत असताना या आजाराशी सामना करताना व त्याच्या नातेवाईकांना मोठा त्रास होत असताना प्रशासन त्यांच्या सेवेसाठी २४ तास प्रयत्न करत आहे.

अजूनही काही लोक व तरुण मंडळी यांना त्याचे गांभीर्य वाटत नसल्याने याची शिक्षा निष्पाप घरातील लोकांना भोगावी लागत आहे.अजूनही वेळ गेलेली नसून विनाकारण घरातील सदस्य बाहेर फिरत असतील,

तर त्यांना आता महिलांनी व कुटुंबातील प्रमुखांनी घरात थांबविण्यासाठी सूचना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

केवळ एक किरकोळ चूकसुद्धा आपले कुटुंब उघड्यावर येण्यासाठी कारण ठरू शकत असल्याने सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून एक जागरूक नागरिक या नात्याने लोकांनी विनाकारण रस्त्यावर फिरू नये, व पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन न्हाहाळदे यांनी केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe