Women’s Day ! तुमच्या आयुष्यातील खास स्त्री ला द्या हे अनोखे गिफ्ट

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News :- 8 मार्च 1908 रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, 8 मार्च हा`जागतिक महिला-दिन’ म्हणून साजरा केला जातो. वास्तविक, प्रत्येक मानवी जीवनात स्त्रिया आई, बहीण, मुलगी, बायको, सून, मैत्रीण अशा अनेक पात्रांची भूमिका ती निभावत असते म्हणून त्यांच्या प्रती प्रेम आणि आदर व्यक्त केला पाहिजे,

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आम्ही तुमच्या आयुष्यातील खास महिलांना पाठवण्यासाठी काही शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत जे तुम्ही सोशल मीडियावर शेअर करु शकता.

नानाविध भूमिकांमधून आयुष्याच्या प्रत्येक क्षणी, प्रत्येक टप्प्यावर सोबत करणाऱ्या “ती”ला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

स्त्री म्हणजे एक खडतर वाट…. अश्यक्य ते शक्य करून दाखविणारी अन्यायाला न्याय मिळवून देणारी जी बदलेल समाजाची वहिवाट.. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

आदिशक्ती तू ,प्रभूची भक्ती तू झाशीची राणी तू ,मावळ्यांची भवानी तू प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू आजच्या युगाची प्रगती तू जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

ज्याला स्त्री ‘बहिण’ म्हणून कळली तो मुक्ताईचा ‘ज्ञानोबा’ झाला…. ज्याला स्त्री ‘मैत्रीण’ म्हणून कळली तो राधेचा ‘शाम’ झाला…. ज्याला स्त्री ‘पत्नी’ म्हणून कळली तो सितेचा ‘राम’ झाला…. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपली योग्य भुमिका बजावून यशस्वीपणे आपले कर्तृत्व जगाला दाखवून… आई,बहीण, पत्नी मुलगी आणि मैत्रीण अशा विविध रुपात पुरुषांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या समस्त स्त्री वर्गाला जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

अन्नपूर्णा तू ,गृहलक्ष्मी हि तू आणि तुच आहेस दुर्गा माता रोमारोमात तुझ्या भरलीये ममता आणि कणखरता जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe