अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- कर्जत तालुक्यातील राशीन येथील एका दूध डेअरी कर्मचाऱ्याने डेअरीला आग लावल्याची घटना घडली आहे.
डेअरी मालकाने पगार न दिल्याच्या रागातून गणेशवाडी येथील खाजगी दूध डेरी मध्ये काम करणार्या कामगार राहुल मोरे याने त्याच्या मालकाच्या दूध डेरी प्लांट चे कार्यालय ,
स्टोअर रूम ,जनरेटर रूम ला आग लावली.त्यात सुमारे सात लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे.
याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन कामगार राहुल मोरे ला अटक केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम