अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- शेवगाव केसरी कुस्ती स्पर्धा व कुस्ती मैदानात उत्कृष्ट कामगिरी करीत मानाची चांदीची गदा पटकाविल्याबद्दल कुस्तीपटू पै. महेश रामभाऊ लोंढे यांचा आमदार निलेश लंके यांनी सत्कार केला.
यावेळी आदेश बचाटे, मयुर साठे, महेश दिवेकर, किरण जरे, यश पवार, राकेश ठोकळ आदी उपस्थित होते. आमदार निलेश लंके म्हणाले की, जिल्ह्याला कुस्ती क्षेत्राचा मोठा वारसा लाभला आहे.
शहरातील मल्ल विद्येच्या इतिहासाशी लोंढे परिवाराचे नांव जोडले गेले आहे. लोंढे कुटुंबातील मल्लांनी जिल्ह्यासह महाराष्ट्रभर कुस्तीचे मैदान गाजवले.
प्रसिध्द मल्ल पै. रामभाऊ लोंढे यांचे चिरंजीव असलेले महेश लोंढे कुस्ती क्षेत्रात आपला नांवलैकिक मिळवत आहे. महाराष्ट्रातील मल्लांकडून भविष्यात भारताला ऑलंम्पिक मध्ये सुवर्णपदक मिळण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
नुकतेच शेवगाव येथे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सदर कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पै. महेश लोंढे यांची पै. मयुर चांगले (शिर्डी) यांच्यात मॅटवर कुस्ती झाली.
यामध्ये पै. लोंढे यांनी उत्तम कामगिरी करीत चांगले यांच्यावर विजय मिळवला व मानाची चांदीची गदा पटकाविली आहे. पै. महेश लोंढे यांना त्यांचे चुलते वस्ताद पै. संभाजी लोंढे, काका नगरसेवक पै. सुभाष लोंढे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम