अहमदनगर Live24 टीम, 03 मार्च 2021:- श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव चिखली शिवारातील महिंदेश्वर मंदिराच्या डोंगर माथ्यावरील जंगलाला मंगळवारी दुपारच्या सुमारास आग लागली.
यात सुमारे एक हजार एकरावरील लाखो रुपयांची वनसंपत्ती जळुन खाक झाली तर अनेक पशु, पक्षी सरपटणारे प्राणी आगीच्या भक्षस्थानी पडले.
याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती समजताच त्यांनी तात्काळ चिखली तसेच कोळगाव येथील तरुणांच्या साहाय्याने ही आग आटोक्यात आणल्याने मोठी हानी टळली. नगर दौंड रस्त्यावरील कोळगाव चिखली शिवारात महिंदेश्वर मंदिराच्या डोंगर माथ्यावरील जंगलाला आज दुपारी लागलेल्या आगीत लाखो रुपयांच्या वनसंपदेचे नुकसान झाले.
भर दुपारी उन्हाचा पारा वाढलेला असताना लागलेल्या आगीत सुमारे एक हजार एकरावरील लाखो रुपयांची वनसंपत्ती जळुन खाक झाली तर अनेक पक्षी, सरपटणारे प्राणी,ससे, हरिण, तरस, दुर्मिळ पक्षी, वन्यजीव आगीच्या भक्षस्थानी पडले.
जंगलाला आग लागल्याचे समजताच काही तरुणांनी वन विभागाला माहिती देत घटनास्थळी वनरक्षक हरीश मुंढे अनंत तिवारी याना सहकार्य करत आग विझविण्यासाठी चिखली कोळगाव परिसरातील नागरिकांनी व तरुणांनी मदत करत आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली.
- ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|