अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- शिर्डी साई बाबा संस्थान अध्यक्षपदासाठी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अनेक आमदार अध्यक्षपदासाठी चर्चेत असताना माजीमंत्री स्व.गोविंदराव आदिक यांचे सुपुत्र यांनी आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतल्याने संस्थांनच्या अध्यक्षपदासाठी अविनाश आदिक यांची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सध्या शिर्डी संस्थांच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष या पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय कॉग्रेसमध्ये रस्सीखेच सुरूच असून येत्या दोन दिवसात त्याचा तिढा सुटणार आहे. अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कडून आ.आशुतोष काळे,
आ.रोहित पवार, आ.निलेश लंके यांची नाव चर्चेत असताना माजीमंत्री स्व.गोविंदराव आदिक यांचे सुपुत्र राष्ट्रवादीचे युवा नेतृत्व अविनाश आदिक यांनी मुंबई येथे शरदचंद्र पवार यांची भेट घेतली.
विश्वस्त निवडीच्या लगबगीत त्यांनी पवार यांची भेट घेतल्याने या भेटीला महत्व प्राप्त झाले आहे. अतिशय संयमी, शांत तसेच अभ्यासू नेतृत्व म्हणून आदिक यांच्याकडे पाहिले जाते.
त्यामुळे शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदासाठी ऐनवेळी अविनाश आदिक यांचे नाव पुढे येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम