अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील मढी येथील चैतन्य कानिफनाथांच्या संजीवन समाधीला पहाटे चंदनाचा लेप लावुन महाआरती करुन गुढीपाडव्याची महापुजा केली.
कोरोनाशी युद्ध जिंकण्याची शक्ती नाथभक्तांना मिळावी अशी प्रार्थना कानिफनाथ चरणी करण्यात आली. कोविडच्या प्रादुर्भावामुळे विधीवत पुजा करुन मंदिर बंद करण्यात आले. गुढी पाडव्याला कानिफनाथांच्या यात्रेची सांगता होत असते.
मंदिर बंद असल्याने मढीत शुकशुकाट होता. कानिफनाथांच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी देशभरातुन नाथभक्त होळीपासुन ते गुढीपाडव्यापर्यंत मढी येथे येत असतात. कोरोनाच्या बंधनामुळे यावर्षी यात्रोत्सव बंद होता.
सोमवारी चार वाजता पैठण येथुन आणलेल्या गंगेच्या पाण्याचा जलाभिषेक करण्यात आला होता. मंगळवारी पहाटे साडेतीन नाजता नाथांच्या समाधीला चंदनाचा लेप लावण्यास सुरुवात केली. त्यानंतर कानिफनाथांचा जयघोष करीत महाआरती करण्यात आली.
नाशिक येथील नाथभक्तांनी समाधी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट केली आहे. गुढी पाडव्याला नाथांच्या समाधीचे थेट दर्शन घेण्याचा वर्षातला एकच दिवस नाथभक्तांसाठी पर्वणी असतो. कोवीडमुळे मंदिर बंद असल्याने दर्शनापासुन नाथभक्त वंचीत राहीले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|