Yamaha Aerox 155 : यामाहाने आता भारतीय बाजारातपेठेत 155 cc इंजिन असणारी स्कूटर लाँच केली आहे. जी तुम्ही आता मेटॅलिक ब्लॅक, ग्रे वर्मिलियन, रेसिंग ब्लू तसेच मेटॅलिक सिल्व्हर या चार रंग पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.
या स्कुटरचे शक्तिशाली इंजिन 15 PS पॉवर आणि 13.9 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच या स्कूटरला Yamaha Y-Connect अॅपद्वारे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी मिळत आहे. किमतीबद्दल बोलायचे झाले तर बाजारात एक्स-शोरूम 1.41 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे.
चार रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करता येणार
कंपनीने आपल्या नवीन Yamaha Aerox 155 ची नुकतीच अपडेटेड आवृत्ती लाँच केली आहे. जी बाजारात एक्स-शोरूम 1.41 लाख रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. ती मेटॅलिक ब्लॅक, ग्रे वर्मिलियन, रेसिंग ब्लू आणि मेटॅलिक सिल्व्हर या चार रंगांच्या पर्यायांमध्ये आणि एकाच प्रकारात उपलब्ध आहे.
126 किलो वजन आणि नियंत्रित करणे अतिशय सोपे
Aerox 155 चे शक्तिशाली 155 cc इंजिन शहर आणि ग्रामीण दोन्ही रस्त्यांवर कार्य करण्यासाठी कंपनीने बनवले आहे. तिचे वजन फक्त 126 किलो इतके आहे. त्यामुळे ते ऑपरेट करणे आणि नियंत्रित करणे अतिशय सोपे आहे. या स्कूटरमध्ये डिजिटल एलसीडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे.
स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी
या स्कूटरला Yamaha Y-Connect अॅपद्वारे स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी मिळत आहे. तसेच यात सिंगल-चॅनल एबीएस आणि सेगमेंट-फर्स्ट ट्रॅक्शन कंट्रोल दिला जात आहे. यात एक्सटर्नल फ्युएल फिलर कॅप, मल्टी-फंक्शन की होल, फ्रंट स्टोरेज पॉकेट आणि 24.5 लीटर अंडरसीट स्टोरेज मिळत आहे.
मागील बाजूस 130mm ड्रम ब्रेक तर समोरील बाजूस 230mm डिस्क ब्रेक उपलब्ध
कंपनीच्या नवीन स्कूटरला टेलिस्कोपिक फोर्क आणि ट्विन शॉक शोषक असणारे 14-इंच टायर आहेत. ज्यामुळे प्रवास सुखकर होतो. तर स्कुटरच्या सीटची उंची 790mm आहे. याचे ग्राउंड क्लीयरन्स 145 मिमी असून जे अपघात टाळण्यास मदत करते. Aerox ला मागील बाजूस 130 mm ड्रम ब्रेक आणि पुढील बाजूस 230 mm डिस्क ब्रेक उपलब्ध आहे.