कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात्रा रद्द

अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढला आहे. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांसह प्रशासन देखील सतर्क झाले आहे.

दरम्यान या संसर्गामुळे गेल्या वर्षभरापासून अनेक सण उत्सव रद्द साध्या पद्धतीने तर काही ठिकाणी रद्द करण्यात आले आहे.

कोरोना आजाराचा संभाव्य धोका लक्षात घेऊन आज रविवारी आणि उद्या 5 एप्रिलला साजरी होणारी नगर तालुक्यातील वडगावगुप्ता

येथील दावल मलिक बाबाची यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती यात्रा कमेटीचे अध्यक्ष व सरपंच विजय शेवाळे व ट्रस्टी अब्बास सय्यद यांनी दिली.

यात्रा मोठ्या प्रमाणात भरत असल्याने तसेच हजारो भाविक दर्शनाला येत असल्याने तमाशा व हंगामा रद्द करण्यात आला असल्याचे सरपंच शेवाळे यांनी कळविले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|