मढीपाठोपाठ आता ‘या’ देवस्थानचा यात्रोत्सव रद्द!

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- जिल्ह्यासह राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाथर्डी तालुक्यातील श्रीक्षेत्र वृध्देश्वर येथे दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री निमित्त आयोजित यात्रोउत्सव यावर्षी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता.

प्रशासनाच्या सूचनेवरून रद्द करण्यात आला असल्याची माहिती देवस्थान समितीच्यावतीने दिली आहे. गेल्या वर्षभरापासून या संसर्गामुळे विविध ठिकाणचे यात्रोत्सव रद्द ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून,

श्रीक्षेत्र वृद्धेश्वर येथे दि.११मार्च रोजी आयोजित करण्यात येणारा यात्रोत्सव रद्द करण्यात आला असून. या दिवशी राज्यभरातील कोणी भाविकांनी वृद्धेश्वर येथे गर्दी करू नये तसेच

पैठण येथून कावडी घेऊन येण्यासाठी देखील कोणी भाविकांनी जाऊ नये असे देखील आवाहन देवस्थान समितीच्यावतीने केले आहे.

केवळ विश्वस्त पुजारी अशा पाच व्यक्तींच्या हस्ते महाशिवरात्रीच्या दिवशी विधीवत महापूजा केली जाणार आहे.त्यानंतरचे सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News