फक्त 20 हजारपेक्षा कमी किमतीत मिळेल वनप्लसचा ‘हा’ झक्कास फोन! youtube व्हिडिओ बघत असाल तर सलग 20 तास करता येईल फोनचा वापर

Ajay Patil
Published:
oneplus nord ce4 phone

सध्या मार्केटमध्ये अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी वेगवेगळी वैशिष्ट्य असलेले आणि परवडणाऱ्या किमतीत स्मार्टफोन लॉन्च केले असून ग्राहकांना देखील आता कमीत कमी किमतीमध्ये चांगले फोन मिळणे शक्य झालेले आहे. यामध्ये अनेक फीचर्स देण्यात आले असल्याने आणि परवडणाऱ्या किमतीत मिळत असल्याने स्मार्टफोन बाजारपेठेत आता परवडणाऱ्या किमतीतील स्मार्टफोनची मागणी वाढताना आपल्याला दिसून येत आहे.

स्मार्टफोनच्या बाबतीत बघितले तर जास्त करून वन प्लस या प्रीमियम रेंज मधील जे स्मार्टफोन आहेत त्यांना एक प्रतिष्ठेचे लक्षण देखील मानले जाते. आयफोनला तोडीसतोड असे वैशिष्ट्ये वनप्लसमध्ये आपल्याला बघायला मिळतात. परंतु गेल्या काही दिवसात आपण स्मार्टफोन बाजारपेठेचा विचार केला तर रियल मी आणि रेडमी सारख्या स्मार्टफोनची मागणी सातत्याने वाढत असून वन प्लसने सुद्धा या ब्रॅडला टक्कर देण्यासाठी परवडणाऱ्या रेंज मधले फोन बाजारात लॉन्च केलेले आहेत.

यातीलच एक झक्कास स्मार्टफोन म्हणजे वन प्लस नोट सीई4 हा होय. वन प्लसचा हा सर्वात बेस्ट कॅमेरा व बॅटरी लाइफ चांगला असलेला फोन असून तो यावर्षी 27 जूनला लॉन्च करण्यात आलेला होता व त्याची किंमत 19999 होती.

 वनप्लसचा नॉर्ड CE4 हा फोनचे उत्तम असे फीचर्स

1- कसा आहे डिस्प्ले?- वनप्लसच्या या स्मार्टफोनची स्क्रीन 6.67 इंचाची असून AMOLED डिस्प्लेसह फोनचा रिफ्रेश रेट 120Hz असून ब्राईटनेस 2100 नीटस आहे. ब्राइटनेसची समस्या यामुळे अजिबात उद्भवत नाही. तसेच यामध्ये  AMOLED डिस्प्ले असल्याने रंग सुद्धा तुम्हाला ब्राईट दिसतील व स्क्रीनला एक्वा टच फीचर देण्यात आले आहे.

म्हणजेच तुमच्या स्क्रीनवर पाण्याचे थेंब पडले किंवा तुमचे बोट ओले असतील तर आपण जेव्हा एखाद्या ॲप उघडण्यासाठी त्याला टच करतो तो दुसरेच काहीतरी सुरू होते. परंतु एक्वा टच फीचरमुळे तुमच्या बोटावरचा आणि स्क्रीनवरचा ओलावा स्क्रीन ओळखू शकते व त्यानुसार सेन्सिटीविटी वाढवते किंवा कमी करते. त्यामुळे तुम्हाला जे ॲप उघडायचे आहे तेच त्याच्यावर उघडते.

2- कसा आहे कॅमेरा?- या स्मार्टफोनला बॅकचा प्राइमरी कॅमेरा हा 50 मेगापिक्सल सोनी LYT600 सेन्सरचा आहे तर बॅक सेकंडरी कॅमेरा दोन मेगापिक्सल सेन्सर चा आहे.

कॅमेरा 16 मेगापिक्सलचा असून कॅमेरा करिता ओआयएस  ऑप्टिकल इमेज स्टॅबलायझेशन सिस्टम वापरण्यात आली आहे. म्हणजे प्रकाश कमी असला किंवा फोटो काढताना हालचाल जरी झाली तरी सुद्धा कॅमेराच्या माध्यमातून स्थिर फोटो तुम्हाला काढता येऊ शकतो.

3- कशी आहे रॅम आणि रॉम?- या फोनमध्ये 128 जीबी व 256 जीबी अशा दोन्हींमध्ये आठ जीबी LPDDR4X रॅम देण्यात आलेली आहे. महत्वाचे म्हणजे या फोनची रॅम आठ जीबी असली तरी देखील बारा जीबी रॅम पेक्षा ती चांगली आहे. त्यामागील प्रमुख कारण म्हणजे Nord CE4 Lite हा ऑक्सिजनOS 14 सॉफ्टवेअर स्टोरेज साठी बेस्ट आहे व यात वन प्लसचे रॅम-VITA आणि ROM-Vita हे फीचर्स  वापरण्यात आलेले आहे.

रॅम विटा म्हणजे वनप्लसच्या या फोनमध्ये AI चा वापर करून तयार केलेली प्रणाली आहे ज्यामध्ये फोनचा वापर गरज ओळखून रिकामी कॅपॅसिटी स्टोरेजसाठी वापरली जाते. कंपनीचा दावा आहे की बॅकग्राऊंडला जर तुमचे 26 अँप देखील चालू असले तरी देखील फोनच्या स्पीड मध्ये कुठलाही फरक पडत नाही व तो वेगात काम करतो.

3- या फोनची बॅटरी या फोनमध्ये 5500 mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आलेली आहे. तुम्ही जर youtube व्हिडिओ बघत असाल तर सलग २० तास तुम्ही फोन वापरू शकतात. व्हिडिओ कॉलिंग करत असाल तर 47 तासांपेक्षा अधिक फोनचा वापर तुम्हाला करता येईल. कॉल आणि मेसेज साठी वापर किंवा बेसिक तुमचा वापर असेल

तर दीड ते दोन दिवस बॅटरी टिकेल व विशेष म्हणजे या फोनमध्ये रिव्हर्स वायर चार्जिंगची सोय पण देण्यात आलेली आहे. म्हणजेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये तुम्ही हेडफोन किंवा आपल्या वेगळ्या उपकरणांना जोडून सुद्धा हा फोन बंद होणं थांबवू शकतात. फोनला एक ते शंभर टक्के अशा चार्जिंग करिता 52 मिनिटे लागू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe