अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजा बुद्रुक येथील एका तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणास कंटाळून आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. जालिंदर नानासाहेब बडाख (वय ३९) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
बडाख यांनी श्रीराम फायनान्समधून कर्जरुपात ट्रॅक्टर घेतले होते. शेतीसाठी सोसायटी काढली होती. शेतीत काहीच पिकत नसल्यामुळे कर्जबाजारी झालेल्या जालिंदर बडाख याने रविवारी पहाटे स्वतःच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्याच्यावर रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. जालिंदर बडाख यांच्या पश्चात आई,
पत्नी, एक मुलग, एक मुलगी, भावजई, पुतणी, चुलते, चुलती असा परिवार आहे. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम ।
- © Copyright 2021, all rights reserved