शेतात आढळला तरुणाचा मृतदेह !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- राहाता शहरातील तहसील कार्यालयाजवळील इरिगेशन बंगल्यासमोरील बोठे यांच्या शेतात एका २६ वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृतदेहाशेजारी विषारी औषधांची बाटली सापडल्याने मयत युवकाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.

बुधवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. माहिती समजताच राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन मृतदेहाची पाहणी केली व पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राहाता ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे.

मयत युवकाचे नाव अमोल पावटे असून तो राहाता शहरातील रहिवासी आहे. त्याने आत्महत्या का केली याबाबतचे कारण समजू शकले नाही; मात्र पोलीस तपासात ते निष्पन्न होईल. अविनाश रंगनाथ गाडेकर याने याबाबत खबर दिल्यावरून राहाता पोलिसांनी अकस्मात मुत्युची नोंद केली आहे.

दि. ९ मार्च रोजी मयत युवक सध्याकाळी सहा वाजेच्या सुमारस घराबाहेर पडला होता व रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe