तरुणांनी व्यवसायाकडे वळावे : उदयन गडाख

अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :- दिवसेंदिवस बेरोजगारी वाढत असताना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी तरुणांनी विविध व्यवसायाकडे वळून करीअर निर्माण करावे, असे प्रतिपादन युवा नेते उदयन गडाख यांनी केले.

ते गणेशवाडी ( ता. नेवासे) येथे एका कार्यक्रमात बोलत होते.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच कैलास दरंदले,

गणेशवाडीचे सेवा सोसायटीचे अध्यक्ष दत्तात्रय लोहकरे, डॉ. माऊली दरदले, डॉ. साळुंके, डॉ. अक्षय लोहकरे, डॉ. दादासाहेब दरंदले, डॉ. प्रवीण दरंदले, डॉ. महेश शेटे, डॉ. आदिनाथ दरंदले,

सेवानिवृत्त मेजर अशोक जावळे, प्रा.सोनाली भगत उपस्थित होते. आभार विजय जावळे व भूषण खंडागळे यांनी मानले.