अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- मोबाईलमधील फोटोमुळे झालेल्या बदनामीच्या त्रासाला कंटाळून युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास संगमनेर खुर्द परिसरात घडली.
संगमनेर खुर्द परिसरातील एका युवतीचे श्रीराम राजा लोखंडे याच्या सोबत प्रेमसंबंध होते. लोखंडे याने या युवतीच्या मोबाईलमधील फोटो घेऊन ते त्याच्या मित्रांच्या मोबाईलवर पाठविले.
तसेच या दरम्यान तिला पाहण्यासाठी आलेल्या पाहुण्यांना ते फोटो दाखवून तिची बदनामी केली. या बदनामीच्या त्रासाला कंटाळून या युवतीने आपल्या रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
याबाबत शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी श्रीराम राजा लोखंडे (रा. संगमनेर खुर्द, वैदुवाडी) या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महाले करत आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|