Maruti Suzuki Swift : तुमची आवडती कार लवकरच येणार नव्या अवतारात; जाणून घ्या काय असेल खास?

Sonali Shelar
Published:

Maruti Suzuki Swift : मारुती सुझुकी सध्या आपला पोर्टफोलिओ अपग्रेड करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते आहे. कंपनी आता आपली एक जुनी कार मार्केटमध्ये उपडेट व्हर्जनमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी कंपनीने वॅगनआर आणि सेलेरियो सारख्या वाहनांचा नवा अवतार बाजारात आणला होता. इतकंच नाही तर कंपनीने नुकतीच आपली नवीन MPV मारुती सुझुकी इनव्हिक्टो देखील बाजारात आणली आहे. दरम्यान कंपनी आता आपली सर्वात लोकप्रिय कार स्विफ्ट नव्या अवतारात आणण्याच्या तयारीत आहे.

या कारमध्ये नवीन इंजिनसह 35 किमी पेक्षा जास्त मायलेज पाहता येईल. सध्या या कारची चाचणी सुरू आहे. तुमच्या माहितीसाठी ही कार 2024 मध्ये मार्केटमध्ये येऊ शकते.

नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट संभाव्य वैशिष्ट्ये?

नवीन मारुती सुझुकी स्विफ्ट नवीन डिझाईनसह येण्याची शक्यता आहे. याशिवाय नवीन स्विफ्टचा लूकही स्पोर्टी असण्याची देखील शक्यता आहे. यामध्ये तुम्हाला नवीन डिझाइन केलेले ग्रिल, नवीन एलईडी एलिमेंट्स आणि स्लीक हेडलॅम्प पुढील बाजूस दिले जाऊ शकतात. याशिवाय, यात अनेक अपडेट गोष्टी पाहायला मिळतील.

मारुती सुझुकी स्विफ्ट इंजिन

या कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनी नवीन स्विफ्टमध्ये 1.2 लीटर, 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन देऊ शकते. यामध्ये हायब्रीड तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येणार आहे. त्याच्या मदतीने ही कार 35 ते 40 kmpl चा मायलेज देऊ शकेल.

मारुती सुझुकी स्विफ्ट संभाव्य किंमत?

तुमच्या माहितीसाठी याच्या किमती अद्याप समोर आलेल्या नाहीत. मात्र जुन्या मॉडेलच्या तुलनेत कंपनी ही कार 1.50 ते 2 लाख रुपयांच्या महागड्या किमतीत बाजारात आणू शकते, असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळेच ते 7 ते 9 लाख रुपये किमतीत बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe