Shirdi News:- अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघ हा अनेक अर्थाने जितका महत्त्वपूर्ण आहे तितका हा मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा बालेकिल्ला समजला जाणारा मतदारसंघ असून त्या दृष्टिकोनातून या मतदारसंघाला तितकेच महत्त्व आहे.
जर आपण शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास बघितला तर या ठिकाणहून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सहा वेळा या मतदारसंघात करिष्मा दाखवला असून मतदारसंघांमध्ये विकासाची कामे देखील मोठ्या प्रमाणावर केली असल्याने कुठल्याही निवडणुकीमध्ये या ठिकाणाचा मतदार हा मोठ्या प्रमाणावर विखे पाटील यांच्यासोबत असल्याचे आपल्याला कायम दिसून येते. शिर्डी म्हटले म्हणजे श्री साईबाबा देवस्थान मुळे हा मतदारसंघ कायम राजकीय क्षितिजावर चर्चेचा विषय ठरतो.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बघितले तर या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना उमेदवार अभय शेळके यांचा पराभव केला होता व तब्बल 70 हजार मतांच्या फरकाने ही निवडणूक जिंकली होती. परंतु आपल्याला माहित आहे की अहिल्यानगर जिल्ह्यातील जर आपण कट्टर विरोधक बघितले तर यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात ही दोन नावे सगळ्यात अगोदर समोर येतात.
त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून विखे पाटील यांचा पराभव व्हावा या दृष्टिकोनातून महाविकास आघाडी आणि बाळासाहेब थोरात यांच्याकडून तगडा उमेदवार देण्याचे एक आव्हान होते व त्यांनी विखे पाटील यांच्या कट्टर विरोधक समजल्या जाणाऱ्या प्रभावती घोगरे यांना उमेदवारी दिली.
परंतु जर शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर या ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्राबल्य आणि प्रभाव मोठ्या प्रमाणावर असून जरी प्रभावती घोगरे यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी देण्यात आली होती परंतु त्यांचा तितकाचा प्रभाव या मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या दरम्यान देखील दिसून आला नाही.
त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना या निवडणुकीत पराभूत करायचेच हा चंग बांधून महाविकास आघाडीने संपूर्णपणे प्रयत्न केल्याचे दिसून आले.
राहता शहरात काँग्रेस कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप?
मतदानाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये अनेक ठिकाणी पैसा वाटल्याच्या तक्रारी पुढे आल्या व काही ठिकाणी भरारी पथक आणि पोलिसांच्या माध्यमातून बऱ्याच जणांना अटक देखील करण्यात आल्याच्या बातम्या आपण ऐकल्या असतील.
अशाच प्रकारचा धक्कादायक व्हिडिओ शिर्डी विधानसभा मतदारसंघातील राहता शहरातून समोर आला असून या ठिकाणी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांना मोठ्या प्रमाणावर पैसे वाटप केले जात असल्याचे दिसून येत आहे व या वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रात्रीच्या वेळेस काही कार्यकर्ते मतदारांना पैसे देत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
त्यामुळे शिर्डी विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेसकडून मतदारांना लक्ष्मी दर्शन घडवून आमिष दाखवण्याचा हा एक प्रकार असल्याने त्यामुळे खळबड उडाली आहे.