विजेच्या धक्क्याने युवकाचा मृत्यू! वडील आणि भाऊ जखमी 

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :- पहाटे शौचासाठी घराबाहेर जात असताना घराबाहेर पडलेल्या विजेच्या तारेवर पाय पडल्याने युवकाच्या ओरडण्याने वडील व मोठा भाऊ यांनी त्याला ओढण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांना जबर धक्का बसून ते दोघ जखमी झाले.

एकाचा मृत्यू झाला. ही घटना जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथे पहाटे घडली. योगेश बळीराम जायभाय असे त्या मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश जायभाय हा पहाटे सहाच्या सुमारास नेहमीप्रमाणे उठून शौचालयाला जायला चालला असता घरा जवळील विद्युत खांबावरील तार तुटून खाली पडली होती.

ती त्यास दिसली नाही व या तारेवर त्याचा पाय पडल्याने त्याला शॉक बसला,त्यामुळे तो ओरडला त्यावेळी त्याचे वडील बळीराम जायभाय व भाऊ गोकुळ यांना त्याला ओढण्याचा प्रयत्न केला असता त्या दोघांना विद्युत शॉक बसला व ते ही खाली पडले.

यावेळी वडील बळीराम हे बेशुद्ध पडले तर भाऊ गोकुळ याचा हात भाजला त्यावेळी  शेजारील राहणारे नातेवाईक यांनी दोरीच्या साह्याने तार बाजुला करून योगेश याला बाजूला करून जामखेड येथील ग्रामीण रूग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe