यात्रा उत्सव रद्द करुन युवकांनी केले रक्तदान

अहमदनगर Live24 टीम, 24 मार्च 2021:-कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कापूरवाडी (ता. नगर) गावातील यात्रा उत्सव रद्द करुन, काळात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने गावातील संघर्ष युवा प्रतिष्ठान व अर्पण ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबीर घेण्यात आले.

यावेळी प्रतिष्ठानचे ओमकार भगत, आकाश पासलकर, युवराज कराळे, प्रदीप बोरकर, ऋषिकेश झांजे, सागर शेळके, लहानु देवकर, वैभव तोडमल, नवनाथ कराळे, वैभव कराळे आदीसह प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.

कापूरवाडी येथे सालाबादप्रमाणे कानिफनाथ यात्रा उत्सवचे आयोजन करण्यात येते. या वर्षी कोरोनाचा सावट असल्यामुळे यावर्षी यात्रा रद्द करून रक्तदान शिबिर घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्यात आली.

या शिबीरात गावातील युवकांनी उत्सफुर्तपणे रक्तदान केले. गावातील युवकांनी पुढाकार घेऊन राबविलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर