राग आल्याने झोमॅटो बाॅयने केले ‘असे’ कृत्य …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-ऑर्डर रद्द केली म्हणून झोमॅटो बाॅयने हॉटेल चालकाच्या डोक्यात लोखंडी राॅड घालत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

हा प्रकार पुण्यातील बाणेर परिसरात घडला. याप्रकरणी विशाल विजय अग्रवाल ( ४०,रा. अ‍ॅक्सिस स्ट्रीट बाणेर रोड) यांनी चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार.

झोमॅटो बॉय रामेश्वर वाघाजी तडसे (३५, रा. हिंजवडी) व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हॉटेल चालक अग्रवाल यांना झोमॅटोवरून ऑर्डर आली होती. ती ऑर्डर झोमॅटो बॉय रामेश्वरला देण्यात आली होती.

अग्रवाल यांनी झोमॅटो बॉय रामेश्वरला फोन केला.मात्र, त्याने फोन उचलला नाही. याची माहिती अग्रवाल यांनी झोमॅटोला दिली होती.

त्यानुसार त्यांनी दुसर्‍या झोमॅटो बॉयला ऑर्डर पोहच करण्यासाठी हॉटेलला पाठवले होते.दरम्यान, रामेश्वर हा त्या हॉटेलमध्ये गेला.

व अग्रवाल यांना माझी ऑर्डर का रद्द केली, असे म्हणत शिवीगाळ करून अग्रवाल यांच्या डोक्यात लोखंडी स्टँड मारले. त्याच्या साथीदारांनी मारहाण करून हॉटेलचा दरवाजाही तोडला.

अग्रवाल यांनी याबाबत पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी चतुःश्रुंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe