झोमॅटोने आणली आहे एका कामासाठी लाखो रुपये कमाविण्याची संधी !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 9 जुलै 2021 :- झोमॅटोने अशी घोषणा केली आहे की कंपनीची वेबसाइट किंवा ॲपमध्ये बग शोधणाऱ्याला ३ लाखांपर्यंतचे बक्षीस दिले जाईल.

कंपनीच्या वक्तव्यानुसार, ‘बग बाउंटी प्रोग्राम कंपनीची सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने केल्या जाणाऱ्या प्रयत्नातील महत्त्वाचा हिस्सा आहे. आम्ही अशी अपेक्षा व्यक्त करतो की यामुळे प्रत्येक हॅकरला कम्युनिटी बग शोधण्यात प्रोत्साहन मिळेल.

आमच्या या प्रोग्रॅममध्ये सहभागी होण्यासाठी धन्यवाद. आम्ही तुमच्या अहवालाची प्रतिक्षा करू.’ झोमॅटोचे सिक्युरिटी इंजिनिअर यश सोढा यांनी बग बाउंटी प्रोग्रॅमबाबत माहिती दिली आहे.

बगमुळे कंपनीच्या सिक्युरिटीला किती नुकसान होऊ शकतं याचा तपास CVSS अंतर्गत केला जाईल. या आधारेच बक्षीस देण्यात येईल. जेव्हा CVSS 10.0 असेल तेव्हा तो शोधणाऱ्याला ४००० डॉलरचे बक्षीस देण्यात येईल.

तर CVSS 9.5 असणारा बग शोधणाऱ्याला ३००० डॉलरचे बक्षीस मिळेल. झोमॅटो बग बाउंटी प्रोग्रॅममध्ये सहभागी होण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनची आवश्यकता असेल. झोमॅटोचा आयपीओ१४ जुलै रोजी खुला होणार असून १६ जुलै रोजी बंद होईल.

कंपनीने या इश्यूकरता प्राइस बँड ७२-७६ रुपये निश्चित केला आहे. बऱ्याच काळापासून गुंतवणूकदार या आयपीओच्या प्रतीक्षेत होते. या आयपीओच्या माध्यमातून ९३७५ कोटी रुपयांचा फंड उभारण्याची कंपनीची योजना आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!