असं एक मंदिर जिथली माती खाल्ल्याने सर्पदंशाचा प्रभाव होतो कमी, लोकांची लागलते रांग

Updated on -

Marathi News : आपल्या देशात असे अनेक गावे आहेत, मंदिरे आहेत की ज्याविषयी अनेक कथा, आख्यायिका प्रसिद्ध आहेत. काही ठिकाणच्या अशा काही घटना आहेत की ज्याचे कोडे अद्याप शास्त्रज्ञांनाही उलगडलेलं नाही.

अशीच छत्तीसगड राज्यातील सक्ती जिल्ह्यातील कैथा गावाविषयी एक लोकप्रिय कथा प्रचलित आहे. या कथेनुसार गावातील जमीनदाराने एका सापाचे प्राण वाचवले होते. त्यामुळे सर्पदेव प्रसन्न झाले आणि त्याने संपूर्ण गावाला सर्पदंशापासून मुक्तीचे वरदान दिले. त्यानुसार तेव्हापासून सर्पदंश झालेल्या व्यक्तीस गावातील माती खाल्याने सापाचे विष व त्याच प्रभाव संपतो असे म्हटले जाते.

सहसा एखाद्याला साप चावला की एकतर लोक डॉक्टरांकडे धाव घेतात किंवा गावातील सापाचे विष काढणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे जातात. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की एक असे गाव आहे जिथे सर्पदंश झाला तर लोक डॉक्टरकडे किंवा विष उतारावणाऱ्याकडे जात नाहीत.

कारण त्या गावातील मातीच त्यांच्यासाठी एक वरदान आहे. ती खाल्ल्यानेच सर्पदंश, सापाचे विष कमी होते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका गावाची आणि तेथील शिवमंदिराच्या मातीची माहिती देणार आहोत, ज्यांना नागदेवतेचा आशीर्वाद आहे.

बिरतिया बाबाचे मंदिर

छत्तीसगडमधील सक्ती जिल्ह्यातील कैथा गावात बिरतिया बाबांचे मंदिर आहे. या ठिकाणची माती खाल्ल्याने अत्यंत विषारी सापाचे विषही बाहेर पडते, अशी या ठिकाणाविषयी मान्यता आहे. नागपंचमीच्या दिवशी बिरतिया बाबांच्या मंदिरात बाबा आणि नागदेवतेची पूजा करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. या सिद्धपीठ मंदिरात पूजेसाठी दूरदूरवरून लोक येतात.

मान्यता

अनेक वर्षांपूर्वी या गावातील एका जमीनदाराने सापाचे प्राण वाचवले होते, त्यामुळे सर्पदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी या गावाला वरदान दिले की सर्पदंश झालेल्या व्यक्तीला या गावातील माती खायला लावली की त्याचे विष उतरेल.

असे या गावातील ज्येष्ठ लोकांचे म्हणणे आहे. ही घटना या शिवमंदिराजवळ घडली असावी, त्यामुळे येथे भगवान भोलेनाथाचे दर्शन घेतल्याने भाविकांचे दु:ख दूर होते, अशी लोकांची श्रद्धा आहे.

दूर दूरवरून भाविक येतात

नागपंचमीच्या दिवशी बिरतिया बाबा आणि नागदेवतेच्या पूजेसाठी भाविकांची रांग लागते. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला वेळीच गावात आणून इथली माती खायला दिल्यास त्याचा जीव वाचू शकतो, असा लोकांचा विश्वास आहे. कैथा गावाचे महत्त्व आणि श्रद्धा अशी आहे की, आपत्कालीन परिस्थितीत त्याचा वापर करण्यासाठी भाविक गावातील माती सोबत घेऊन घरी ठेवत असतात.

ह्या बातम्या वाचल्या का ?

27 मायलेज असणाऱ्या ‘या’ कारवर मिळेल बंपर डिस्काउंट, लगेचच करा खरेदी
सप्टेंबरमध्ये सर्वाधिक विकल्या गेल्या ‘या’ 5 एसयूव्ही, पहा यादी
मारुतीची सर्वात लहान इलेक्ट्रिक कार! सिंगल चार्जवर धावेल 230 किमी

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe