चीनमध्ये कॅन्सरवर उपचार करण्यासाठी गेलेल्या महिलेवर भयंकर पद्धतीने उपचार ! अखेर महिलेचा मृत्यू…

Marathi News

Marathi News : कुठलाही आजार झाला तर आपण डॉक्टरांकडे जातो, कारण आपल्याला माहिती असते की, डॉक्टर आपल्यावर योग्य उपचार करतील आणि आपला जीव वाचवतील. मात्र चीनच्या एका रुग्णालयात कॅन्सरवर उपचार करण्यासाठी गेलेल्या महिलेवर भयंकर पद्धतीने उपचार करण्यात आले. या उपचारात त्या महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, चीनच्या एका स्वयंघोषित ट्यूमर रिसर्च इन्स्टिट्यूटमधील हा गैरप्रकार आहे. या संस्थेवर आरोप आहे की, ते कॅन्सर नष्ट करण्याचा दावा करतात आणि त्यासाठी असे विचित्र उपचार तंत्र वापरतात, ही उपचार पद्धती ऐकूनच आपल्याला धक्का बसल्याशिवाय राहत नाही.

एका व्यक्तीने आरोप केला आहे की, आपल्या आईला स्तनाचा कर्करोग आहे, तिच्यावर उपचारादरम्यान इतके प्रयोग केले की त्यातच तिचा मृत्यू झाला. हे प्रयोगही मोफत नव्हते, तर त्यासाठी त्यांनी २,००,००० युआन म्हणजेच भारतीय चलनात सुमारे २३ लाख रुपये आकारले.

दरम्यान, महिलेला शेवटच्या टप्प्यातील स्तनाचा कर्करोग झाल्याचे निदान झाले. यानंतर मला हुबेईमधील या संस्थेची माहिती मिळाली, जिथे मी आईला घेऊन आलो. त्यांच्याकडे उपचारासाठी एक नवीन औषण असून जे कर्करोगाच्या पेशी नष्ट करू शकते, असे येथे सांगण्यात आले.

आईला प्रथम लिक्विड उपचाराच्या नावाखाली विविध औषधे देण्यात आली. याशिवाय आईच्या छातीत डझनभर इंजेक्शन्स देण्यात आली, जेणेकरून तिचे रक्त पातळ होऊ शकेल. यानंतर एक उपचार करण्यात आला तो खूप विचित्र होता.

उपचाराच्या नावाखाली संस्थेतील लोकांनी आईच्या छातीवर सिमेंट आणि लिंबूचे मिश्रण लावले. यानंतर दोन महिन्यांनी तिथली त्वचा पिकली आणि शरीरात ‘पू’ तयार होऊ लागला. भयंकर वेदना सहन करून शेवटी यातच तिचा मृत्यू झाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe