Marathi News : ज्योतिषशास्त्रानुसार या वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण सर्व पितृ अमावस्येला असणार आहे. नवरात्रीच्या अगदी आधी असल्याने अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदच येऊ शकतो. ज्योतिषींच्या मते हा अत्यंत दुर्मिळ योगायोग मानला जातो.
असा योगायोग साधारण 178 वर्षानंतर घडतो, असे मानले जाते. चला जाणून घेऊया या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण कोणत्या राशींसाठी खास आहे.

तब्बल 178 वर्षांनंतर एक खास योगायोग
यावर्षी 14 ऑक्टोबर रोजी सर्व पितृ अमावस्येला सूर्यग्रहण होत आहे. हे ग्रहण खूप खास मानले जात आहे, कारण ग्रहणाच्या वेळी सूर्य आणि बुध दोघेही कन्या राशीत असतील. अशा तऱ्हेने बुधादित्य योग निर्मिती होत आहे. त्याचबरोबर सर्वपितृ अमावस्येला सूर्यग्रहण होत आहे. हे ग्रहण 1845 मध्ये झाल्याचे मानले जाते. आता तब्बल 178 वर्षांनंतर असा योगायोग घडत आहे. शनिवारी येत असल्याने त्याला शनी अमावस्या असेही म्हटले जाईल.
मिथुन
या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण मिथुन राशीच्या लोकांना विशेष लाभ देऊ शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जीवनात अनेक प्रकारचे आनंद मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. यामुळे तुमच्यावर काही मोठी जबाबदारीही येऊ शकते. कुटुंबासमवेत चांगला वेळ व्यतीत करा.
मकर
या राशीच्या लोकांना सूर्यग्रहणाचा विशेष लाभ मिळू शकतो. संपत्तीत वाढ होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. कुटुंबासमवेत चांगला वेळ व्यतीत कराल. प्रलंबित कामे पुन्हा सुरू करता येतील. यामुळे आर्थिक त्रासापासून सुटका मिळेल. गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे.
तुला
या राशीच्या लोकांचे भाग्य उजळवू शकते. समाजात मान-सन्मान मिळेल. आपण आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. व्यवसायातही यश मिळू शकते. आर्थिक समस्यांपासून सुटका मिळेल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत उघडून बचत कराल. कुटुंबासमवेत चांगला वेळ व्यतीत कराल. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्येही लाभ मिळू शकतो.