अॅमेझॉनची ‘ही’ अफलातून सेवा;कोडिंग शिकल्याविनाच करा माेबाइल अॅप तयार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम ,10 जुलै 2020 :  अनेकांना टेक्नॉलॉजीमध्ये काही ना काही करण्याची सवय असते. अनेकांना मोबाईल ऍप बनवण्याचे पॅशन असते. परंतु हे करताना प्रोग्रॅमिंग स्किल्स आणि कोडिंग याचे ज्ञान असावे लागते.

परंतु आता हे न शिकताही तुम्हाला मोबाइल अॅप तसेच वेब पेज तयार करता येणार आहे. यासाठी अॅमेझॉन कंपनीने अॅमेझॉन हनिकोड सर्व्हिस लाँच केली आहे.

हनिकोड सर्व्हिस कोडिंगबद्दल ज्ञान नसतानाही साधारण व्हिज्युअल अॅप्लिकेशन बिल्डरच्या माध्यमातून अॅप तयार करण्याचे सुविधा देते.

अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचे व्हाइस प्रेसिडेंट लॅरी ऑगस्टन म्हणाले, की आमचे ग्राहक या प्रकारच्या सेवेची अनेक दिवसांपासून मागणी करत होते.

आता अॅमेझॉन हनिकोडच्या मदतीने कुणीही अगदी तगडे मोबाइल अॅप आणि वेब पेज तयार करू शकेल. कोणतेही कोड लिहिण्याची गरज नाही. सध्या कंपनीने ही सेवा ऑरेगॉन या पश्चिम अमेरिकेतील भागांत लाँच केली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment