Apple Festive Season Sale :- अमेझॉन आणि फ्लिपकार्ट सध्या मेगा सेल देत आहेत. आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर स्मार्टफोन, टीव्ही, स्मार्टवॉच आदी कमी किमतीत खरेदी करण्याची संधी आहे. दरम्यान, पुढील आठवड्यात अॅपलवर फेस्टिव्ह सेल सुरू होणार आहे.
जर तुम्ही या सणासुदीच्या हंगामात आयफोन आणि मॅकबुक खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे.
सोमवारपासून भारतात अँपलचा फेस्टिव सीज़न सेल सुरू होणार आहे.
या अपकमिंग सेलदरम्यान iPhones, iPads, AirPods, Macs सह अनेक उत्पादनांवर भरघोस सूट मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आयफोन आणि मॅकबुक खरेदी करणार असलं तर तुमच्यसातही ही बातमी महत्वाची आले कारण येथे तुम्हाला सर्व डिटेल्स मिळेल.
दिल्ली, मुंबईत अॅपलच्या ऑफलाइन स्टोअर्समधून सेलचा लाभ
भारतात अॅपलच्या ऑनलाइन स्टोअरवर फेस्टिव्ह सीझन सेल सुरू होणार आहे. दिल्लीतील साकेत येथील अॅपल स्टोअर आणि मुंबईतील अॅपल बीकेसी स्टोअर्समध्ये ऑफलाइन स्टोअर मधून ग्राहकांना स्वस्त आणि चांगले डील मिळतील, असे अॅपलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
Apple च्या ‘या’ प्रोडक्टवर सेलमध्ये मोठ्या प्रमाणात सूट
Apple च्या फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये आयफोन, मॅकबुक किंवा Apple प्रॉडक्ट प्रेमींसाठी चांगल्या ऑफर्स मिळतील. अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल किंवा फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेलप्रमाणेच Apple फेस्टिव्ह सीझन सेलमध्येही कार्डचा वापर करून पैसे वाचवण्याची संधी मिळणार आहे.
सर्वसाधारणपणे Apple मोठ्या सवलतींऐवजी आपल्या उत्पादनांसोबत फ्रीबीज देण्यावर भर देईल.याशिवाय, ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारख्या प्लॅटफॉर्मवर ऍपल डिवाइस वर सध्या भरपूर ऑफर उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ, iPhone 14 (128GB) Flipkart वर Rs 56,999 मध्ये उपलब्ध आहे आणि iPhone 13 Amazon वर Rs 49,499 मध्ये उपलब्ध आहे.
जास्त आहे Apple प्रेमींची संख्या
Apple प्रोडक्ट वापरणाऱ्यांचीसंख्या वाढत आहे. त्यांची टेक्नॉलिजी, लुक आदी गोष्टी शानदार असतात. त्यामुळे अनेक लोक त्यांच्या आगामी प्रॉडक्टची वाट पाहत असतात. अशांसाठी हा सेल लाभदायक ठरेल.