अहमदनगर Live24 ,2 जून 2020 : आपण आपल्या आहारात खाद्य तेलांचा समावेश करतो. या तेलांमध्ये असंख्य पोषक घटकांचा समावेश असतो, ज्यामुळे आपल्या शरीराला प्रचंड प्रमाणात लाभ मिळतात. या तेलाचा तुम्ही शरीराचा मसाज करण्यासाठीही वापर करू शकता.
आयुर्वेदिक औषधोपचारांमध्येही या तेलांचा वापर केला जातो. ज्यामुळे शरीराराला आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक फायदे मिळतात. जाणून घेऊया कोणत्या प्रकारचे तेल शरीराच्या कोणत्या भागावर लावल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
१) मोहरीचे तेल
रात्री झोपण्यापूर्वी नाभीवर नियमित मोहरीचे तेल लावल्यास ओठांचे सौंदर्य टिकून राहण्यास मदत होईल. ओठ कोरडे होणार नाहीत. शिवाय, त्वचेवर नॅचरल ग्लो येईल. याद्वारे तेलातील पोषक घटकांचा संपूर्ण शरीराला पुरवठा होण्यास मदत मिळते.
२) बदाम तेल
बदामाचे तेल तुम्ही आपल्या नाभीवर लावल्यास तुमच्या त्वचेवर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते. बदामाच्या तेलामध्ये अँटी-ऑक्सिडेंट चे प्रमाण जास्त असते. हे घटक त्वचेसाठी सक्रिय स्वरुपात काम करतात, ज्यामुळे त्वचेचा रंग आणि पोत चांगला होण्यास मदत मिळते.
३) लेमन ऑइल
लिंबूमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी चे घटक असतात. लेमन ऑइलमधील पोषण तत्त्वे तुमच्या त्वचेच्या रंगामध्ये होणारे हानिकारक बदल रोखण्यासाठी सक्रिय स्वरुपात कार्य करतात. त्वचा विकार तसंच स्किन पिगमेंटेशनपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपल्या नाभीवर लेमन ऑइल लावून मसाज करायला विसरू नका.
४) कडुलिंबाचे तेल
कडुलिंबाच्या तेलानं नाभीवर मसाज केल्यास चेहऱ्यावरील मुरुम तसंच त्यांचे डाग कमी होण्यास मदत मिळते. यामुळे चेहरा सतेज आणि तजेलदार राहण्यासही मदत मिळते. या तेलामध्ये मुरुमांविरोधात लढण्यासाठी पोषक घटक असतात. या तेलास किंचितसा उग्र सुगंध येतो. पण हे तेल वापरण्याचे फायदे असंख्य आहेत.
५) नारळाचे तेल
नारळाच्या तेलामध्ये आरोग्यासह, केस तसंच त्वचेसाठी उपयुक्त असलेल्या पोषक घटकांचा समावेश आहे. नारळाच्या तेलामुळे आपल्या केस आणि त्वचेला नैसर्गिक मॉइश्चराइझर मिळण्यास मदत होते.
ज्यामुळे कोरडे केस आणि त्वचेच्या समस्या दूर होऊ शकते. सुंदर केस आणि त्वचेसाठी नारळाच्या तेलाचा वापर करावा. जर तुम्हाला रात्रभर नाभीवर तेल लावून ठेवायचे नसल्यास दिवसभरात केवळ २० मिनिटांसाठीही तुम्ही हा उपाय करू शकता. यासाठी कापसाच्या मदतीनं किंवा हातानं तेलाचे थेंब नाभीवर लावा आणि मसाज करा.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews