अहिल्यानगर – वेळ वाचवायच्या नादात बऱ्याच गृहिणी भिजवलेली कणीक फ्रीजमध्ये ठेवतात आणि मग एक-दोन दिवसांनी त्याच्या पोळ्या करतात.
पण हे आरोग्याच्या दृष्टीनं चांगलंच धोकादायक आहे, असं तज्ज्ञ सांगतात. कारण कणीक भिजवून फ्रीजमध्ये ठेवली की काही तासांतच त्यात बॅक्टेरिया तयार होतात. आणि हे बॅक्टेरियायुक्त पदार्थ आपल्या शरीराला नुकसान करतात.

फ्रीजमध्ये थंड हवा वापरली जाते, जी अन्नपदार्थ ताजे ठेवायला मदत करते. पण जर फ्रीज जुना असेल किंवा त्याची क्वालिटी चांगली नसेल, तर त्यातून क्लोरोफ्लोरोकार्बन नावाचा वायू बाहेर पडू शकतो.
हा वायू आरोग्यासाठी खूपच हानिकारक आहे. यामुळे श्वासाचे त्रास, त्वचेचे आजार आणि प्रदूषण वाढायलाही कारण ठरतं. भिजवलेली कणीक ठेवल्यावर त्यात बॅक्टेरिया आणि बुरशी वाढायला जागा मिळते.
खासकरून ८ ते १५ तासांपेक्षा जास्त वेळ कणीक फ्रीजमध्ये राहिली, तर त्यात ई. कोली आणि साल्मोनेला सारखे धोकादायक बॅक्टेरिया वाढतात.
हे बॅक्टेरिया अन्नातून शरीरात गेले तर अन्न विषबाधा, पोटदुखी, उलट्या आणि जुलाब यांसारखे गंभीर त्रास होऊ शकतात.
कणीक जास्त वेळ ठेवली तर तिचा रंग बदलतो, वासही यायला लागतो. जर कणकिला आंबट वास येत असेल किंवा ती काळी दिसत असेल, तर ती वापरायची नाही.
अशी जुनी कणीक पचायला जड जाते आणि त्यामुळे अॅसिडिटी, अपचन किंवा गॅसचा त्रास होऊ शकतो. भिजवलेली कणीक, शिजवलेल्या भाज्या किंवा पाणी घालून केलेला कोणताही पदार्थ फ्रीजमध्ये ठेवणं चांगलं नाही.
कारण असं केलं तर त्यात बॅक्टेरिया तयार होतात. यामुळे पदार्थांची मूळ चव हरवते आणि अॅसिडिटी, अपचन, गॅस यांसारख्या समस्या उद्भवतात.
त्यामुळे फ्रीजमध्ये फक्त कोरडे मसाले, ड्रायफ्रुट्स किंवा न कापलेल्या भाज्या ठेवा. ओले पदार्थ ठेवणं टाळा असा सल्ला आहार तज्ञ ज्योती येणारे यांनी दिला.