उन्हाळाच काय पण सध्या घरोघरी फ्रीजचा वापर केला जातो. परंतु फ्रीज कोणत्या ऋतूत कसा वापरायचा, हे अनेकांना माहित नसते. फ्रीज चालू-बंद करावा काय, याबद्दलही अनेकांना काहीच माहिती नसते. उन्हाळ्यात वारंवार फ्रीज वारपरल्यानंतर लाईटबील जास्त येण्चाया धोका अनेजण व्यक्त करतात. परंतु फ्रीजच्या अशा काही सेटिंग्ज असतात ज्या वापरल्यावर फ्रीजचे इतर धोके टळतात.
तापमान किती असावे?
फ्रीज कसा वापरावा, हे अनेकांना माहित नसते. फ्रीजमध्ये टेम्परेटर सेटींग्जसाठी वेगवेगे मोड असतात याचीही अनेकांना कल्पना नसते. फ्रिज कोणत्या तापमानावर सेट करावा किंवा चालवावा हे समजून घेतले पाहिजे. बहुतेक फ्रिजमध्ये तापमान 1 ते 5 आकड्यांपर्यंत सेट केले जाऊ शकते. उन्हाळ्यात फ्रिज 3 ते 4 क्रमांकावर ठेवणे चांगले, जेणेकरून खाणे-पिणे व्यवस्थित थंड होईल आणि खराब होणार नाही.

हिवाळ्यात फ्रीज वापरावा काय?
फ्रिज हा फक्त उन्हाळ्यात वापरण्यासाठी असतो, असा काहींचा समज असतो. त्यामुळे कित्येकजण हिवाळ्यात फ्रीज बंद करुन ठेवतात. परंतु हे योग्य नाही. थंड हवामानात फ्रिज 1 नंबरवर चालवावे. फ्रिज बराच वेळ बंद ठेवल्यास त्याचा कॉम्प्रेसर जॅम होऊन गरम होऊ शकतो आणि चालू केल्यावर खराब होऊ शकतो.
ब्लास्टपासून कसे वाचायचे?
फ्रीज खराब झाला की आपण लोकल मॅकॅनिकला बोलावतो. त्याच्याकडून स्वस्तातील पार्ट टाकून घेतो. मात्र ते धोकदायक असते. त्यामुळे अनेकदा फ्रीजचा स्फोट होण्याचे प्रकार घडतात. कॉम्प्रेसरशी संबंधित बिघाडासाठी नेहमी कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमधून दुरुस्ती करून घ्यावी. स्थानिक भागांचा वापर केल्यास कॉम्प्रेसरमधील दाब वाढू शकतो आणि त्याचा स्फोट होऊ शकतो. त्यामुळे नेहमी ओरिजिनल पार्ट्सचा वापर करावा.