benefits of Tulsi leaves : भारतातील बहुतेक घरांमध्ये तुळशीची पूजा केली जाते. असे मानले जाते की तुळशी घरात ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होऊन कुटुंबात सुख-समृद्धी येते. तसेच तुळशीच्या झाडाला आयुर्वेदात औषध मानले जाते. कारण, तुळशीच्या पानांमध्ये असलेले औषधी गुणधर्म आपल्या आरोग्यसाठी खूप फायदेशीर असतात.
तूळशीमध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म आढळतात, जे नैसर्गिक प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. तुळशीच्या पानांमध्ये कफ, वात दोष कमी करणे, रक्त शुद्ध करणे, पचनशक्ती आणि भूक वाढवणे असे गुणधर्म आहेत. तुळशीच्या पानांचे नियमित सेवन केल्यास आरोग्याच्या अनेक समस्यांपासून लगेच सुटका मिळू शकते. चला तर मग आजच्या या लेखात तुळशीच्या पानांच्या फायद्यांबद्दल जाणून घेऊया-

उत्तम आरोग्यासाठी अशा प्रकारे करा तुळशीच्या पानांचे सेवन
तुळशीची पाने चघळणे
तुळशीची पाने चघळणे खूप फायदेशीर मानले जाते. यामध्ये असलेले अँटी-फंगल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म रक्तदाब आणि ब्लड शुगरसारख्या समस्यांपासून लेगच आराम देतात. तुळशीची पाने खाण्यासाठी काही पाने तोडून पाण्यात भिजवा. काही वेळाने कोमट पाण्यासोबत याचे सेवन करा.
तुळशीचा चहा
शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तुळशीचा पानांचा चहा देखील खूप फायदेशीर मानला जातो. जर तुम्ही चहाचे शौकीन असाल तर तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. तुळशीचा चहा बनवण्यासाठी एक कप पाणी उकळून त्यात 7 ते 8 तुळशीची पाने टाका. तुम्हाला हवे असल्यास त्यात थोडी वेलची पूडही टाकू शकता. यानंतर चहा चांगला उकळवा, आणि नंतर त्याचा आनंद घ्या.
तुळशीचे पाणी
तुळशीच्या पानांचे सेवन केल्याने पचनाशी संबंधित समस्या दूर होतात. याचे सेवन केल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते, तसेच रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासही हे उपयुक्त आहे. याच्या सेवनासाठी 1 ग्लास पाण्यात 8 ते 10 तुळशीची पाने उकळा. आता त्यात थोडे मध मिसळून पाणी थंड झाल्यावर त्याचे सेवन करा.
तुळस पावडर
जर तुम्हाला अपचन किंवा श्वासाच्या दुर्गंधीची समस्या असेल तर तुळशीची पावडर तुमच्यासाठी उत्तम उपाय ठरू शकते. तुळशीची पावडर तयार करण्यासाठी तुळशीच्या बिया ठेचून बारीक करा. आता त्यात काळे मीठ, दालचिनी पावडर, बडीशेप पावडर घाला. तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्या सोबत याचे सेवन करा. याशिवाय तुम्ही जेवल्यानंतरही त्याचे सेवन करू शकता.
.