भाऊ.. पुन्हा येतोय सनी देओलचा नवीन सिनेमा, ते पण भारत पाकिस्तानवर

Ahmednagarlive24 office
Published:
Marathi news

Marathi news : सनी देओल हे सुपर स्टार आहेत. ९० चे दशक त्यांच्या सिनेमांनी प्रचंड गाजले. त्यांचा एक मोठा चाहता वर्ग आहे. सनी देओल यांचा नुकताच गदर २ हा सिनेमा आला होता. तो प्रचंड गाजला. त्याचा पहिला भाग देखील खूप गाजला होता.

सनी देओल जेव्हा जेव्हा भारत पाकिस्तान संदर्भात फिल्म करतात तेव्हा तेव्हा तो सिनेमा प्रेक्षक अक्षरशः डोक्यावर घेतात. व याला इतिहास देखील साक्षी आहे. आता सनी देओल पुन्हा एक सिनेमात दिसणार आहे. व हा सिनेमा देखील भारत पाकिस्तानवर असल्याची माहिती मिळत आहे. पण यावेळी कथा पूर्णपणे अनोखी आणि नवीन असेल.

*एका पंजाबी नाटकावर आधारित चित्रपट

मिळालेल्या एका रिपोर्टनुसार भारत-पाकिस्तान मुद्द्यावर आधारित ‘जिसे लाहोर ना देखा वो जमै नही’ या पंजाबी नाटकावर सनीचा पुढचा चित्रपट बनणार आहे, ज्यामध्ये 1947 च्या भारत-पाकिस्तान फाळणीच्या वेदना दाखवल्या जाणार आहेत.

काही रिपोर्टनुसार ही एका कुटुंबाची कथा आहे जी लखनौहून लाहोरला जाईल. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हा चित्रपट आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनवला जाणार आहे, तर त्याचे दिग्दर्शक राजकुमार संतोषी करतील. त्यांच्यासोबत सनीने अनेक वर्षांपूर्वी काम केले आहे. घातक, दामिनी, घायल सारखे त्यांचे सिनेमे ब्लॉकबस्टर हिट ठरले होते.

*गदर 2 ने धमाल केली

सनी देओलचा गदर 2 सिनेमा 11 ऑगस्ट ला रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर त्याने भरपूर कमाई केली. लोकांना हा चित्रपट इतका आवडला की आजही अनेक ठिकाणी दाखवला जातो. कमाईबद्दल बोलायचे झाले तर गदर 2 ने अनेकांना मागे टाकले. आता गदर 3 ची तयारीही सुरू झाली आहे. सनी देओल सध्या आपला मुलगा राजवीर देओलच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe