Budh Ast 2023: ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, तर्कशास्त्र, भाषण, मनोरंजन, शिक्षण, लेखन, ज्योतिष इत्यादींचा कारक मानला जातो. यामुळे जेव्हा जेव्हा बुध ग्रह संक्रमण करतो तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकांवर दिसून येतो.
यातच आम्ही तुम्हाला सांगतो 21 एप्रिल रोजी बुध मेष राशीमध्ये उलट दिशेने फिरू लागला आहे आणि 23 एप्रिल 2023 रोजी रात्री 11.58 वाजता तो मेष राशीत मावळेल. यामुळे अनेक राशींना अचानक आर्थिक लाभ मिळणार आहे चला मग जाणून घेऊया बुध ग्रहाच्या अस्तामुळे कोणत्या राशींना फायदे होणार आहे.
कुंभ
या राशीमध्ये बुध ग्रह तिसऱ्या भावात अस्त करणार आहे. यासोबतच बुध पाचव्या आणि आठव्या घराचा स्वामी आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना विशेष लाभ होणार आहे. नोकरी व्यवसायात प्रचंड यशासोबतच करिअरमध्येही प्रगती होऊ शकते. शत्रूवर विजय मिळवता येईल. यासोबतच तुम्हाला परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. पण अनावश्यक खर्चामुळे त्रास होऊ शकतो.
मीन
या राशीमध्ये बुध ग्रह दुस-या घरात मावळत आहे. हे घर खासगी आयुष्य आणि कुटुंबाचे मानले जाते. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांसाठी बुधाची स्थिती संमिश्र असणार आहे. कधी आर्थिक स्थिती चांगली तर कधी वाईट असू शकते. यासोबतच नोकरीत लाभ मिळण्याची शक्यता आहे.
मेष
या राशीमध्ये बुध हा सहाव्या आणि तिसऱ्या घराचा स्वामी असून या राशीमध्ये बुध पहिल्या भावात मावळत आहे. अशा स्थितीत या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. नोकरीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. सरकारी नोकरीची इच्छा असलेल्या लोकांनाही यश मिळू शकते.
व्यवसायातही भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढल्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय सहज साध्य करू शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. पण काही जबाबदाऱ्या वाढू शकतात.
हे पण वाचा :- Kisan Vikas Patra Yojana: संधी सोडू नका ! ‘या’ भन्नाट योजनेत करा गुंतणवूक , काही महिन्यांत पैसे होणार डबल, जाणून घ्या कसं