मुंबई :- शाओमीने भारतात आपला ‘एमआय फॅन फेस्टिवल’ सुरू करण्याचं ठरवलं आहे. या सेल 4 एप्रिल 2019 ते ६ एप्रिल 2019 दरम्यान असणार आहे.
या सेलमध्ये तुम्हाला शाओमी कंपनी विविध स्मार्टफोन्स अवघ्या 1 रुपयात उपलब्ध करुन देणार आहे. शाओमी कंपनीने भारतीय बाजारात आपलं एक वर्चस्व निर्माण केलं आहे.

Mi Fan Festival या सेलमध्ये कंपनी अवघ्या एक रुपयात स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी उपलब्ध करुन देत आहे.
यामध्ये रेडमी नोट 7 प्रो, पोको एफ1, एमआय साऊंडबार, एमआय LED TV 4A PRO (32) आणि इतरही वस्तूंचा समावेश आहे. शाओमीचा हा एक फ्लॅश सेल आहे आणि या सेलमध्ये जर तुम्हाला एक रूपयात स्मार्टफोन मिळाला नाही तर चिंता करण्याची गरज नाहीये.
कारण, कंपनीतर्फे आपल्या विविध प्रोडक्ट्सवर खास सूट देण्यात आली आहे. पाहूयात कुठल्या प्रोडक्टवर किती बचत होईल.
या सेलमध्ये तुम्हाला POCO F1 हा स्मार्टफोन 20,999 रुपयांत, रेडमी नोट 5 प्रो फोन 10,999 रुपयांत आणि रेडमी नोट 6 प्रो हा स्मार्टफोन अवघ्या 10,999 रुपयात खरेदी करता येणार आहे.
- आठव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांपेक्षा पेन्शन धारकांना मिळणार अधिक लाभ ? कस ते वाचा….
- जन्मजात नशीबवान असतात कोणत्याही महिन्याच्या ‘या’ 3 तारखांना जन्मलेले लोक ! Pm मोदी सुद्धा आहेत त्यातील एक
- ‘हे’ 5 शेअर्स गुंतवणूकदारांवर पाडणार पैशांचा पाऊस ! मोतीलाल ओसवाल यांनी सुचवलेले शेअर्स देणार जबराट परतावा
- Aadhar Card च्या ‘या’ नियमांमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल ! आता….
- ‘या’ तारखांना जन्मलेले लोक अचानक होतात श्रीमंत ! १००% मिळवतात यश, झटपट यशस्वी होण्याचे सूत्र असते हाती













