सावधान ! कुलरचा स्फोट होण्याचे प्रकार वाढले; नेमके कारण काय? उपाय काय? वाचा एका क्लिकमध्ये

Published on -

सध्या महाराष्ट्रातील अनेक शहरांतील तापमान गेल्या कित्येक दिवसांपासून 40 अंशाच्या पुढे गेले आहे. अशा परिस्थितीत घरोघरी कुलर घेण्याचे प्रकार वाढले. मात्र गेल्या काही दिवसांपासून कुलरचे स्फोट होण्याचे म्हणजेच कुलरमधून जाळ येण्याचे प्रकारही वाढले आहेत. आता हा अपघात नेमका कोणत्या कारणाने होतो, ते आपण पाहू…

कुलरची मागणी वाढली

सध्या उन्हाने कहर केला आहे. गेल्या आठवड्यापासून काही जिल्ह्यांत अवकाळी पाऊस आला असला तरी, अनेक ठिकाणी कडक उन्हाळाही सुरु आहे. लोक थंड हवा मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात कूलर वापरण्यास सुरुवात करतात. परंतु ते वापरताना एक छोटीशी चूक मोठी दुर्घटना घडवू शकते. सध्या बाजारात अगदी रस्त्यांवरही कुलर विक्रेते दिसू लागले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यातही अगदी रस्त्याच्या कडेला कुलर विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत.

कुलरचे अपघात वाढले

घरात थंड हवा मिळण्यासाठी व घर थंड राहण्यासाठी अनेकजण एसीपेक्षा स्वस्तात येणारे कुलर वापरतात. हे कुलर पाण्यावर चालतात. त्यामुळे अगदी कमी खर्चात घर थंडगार ठेवता येते. परंतु गेल्या काही दिवसांपासून कुलरचे स्फोट होण्याचे प्रकारही समोर आले आहेत. चालत्या कुलरमधून जाळ येऊन शाँर्टसर्किट होण्याचे प्रकारही सध्या वाढले आहेत.

का होतो कुलरचा स्फोट?

कूलर पाण्याशिवाय चालवत असाल, आणि त्याच वेळी कूलरचा वॉटर पंप चालू ठेवला तर तुमची मोठी चूक करताय. कुलरमध्ये पाणी नसतानाही कुलरचा पंप सुरु राहीला तर मोठा अपघात होतो. कूलरचा पंप पॅडवर पाणी पसरवतो, ज्यामुळे थंड हवा निर्माण होते. जेव्हा तुम्ही पाण्याशिवाय पंप चालू ठेवता तेव्हा पंप कोरडा पडतो, ज्यामुळे तो लवकर गरम होऊ शकतो. सतत गरम केल्याने पंपमध्ये शॉर्ट सर्किट होऊ शकते. एका लहानशा ठिणगीमुळे कूलरच्या प्लास्टिक किंवा फायबर बॉडीला आग लागू शकते, ज्यामुळे संपूर्ण कूलरचा स्फोट होऊ शकतो.

काय घ्यायची काळजी?

जर तुम्हाला तुमचा कूलर जास्त काळ टिकवायचा असेल, तर तुम्ही तो योग्यरित्या वापरला पाहिजे. जर तुम्ही पाण्याशिवाय कूलर चालवत असाल तर ताबडतोब कूलर बंद करा. यानंतर कूलरला थोडा वेळ थंड होऊ द्या आणि नंतर पाणी टाकल्यानंतरच वापरा. जर कूलर बराच काळ बंद असेल तर तो चालू करण्यापूर्वी पंप आणि वायरिंग तपासा. यामुळे आगीचा धोका देखील निर्माण होऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe