Chandra Grahan 2023 : दसऱ्यानंतर वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण ! ‘या’ राशींवर दिसून येणार मोठा प्रभाव, जाणून घ्या सुतक कालावधी…

Chandra Grahan 2023 : सूर्यग्रहणानंतर आता वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण होणार आहे. हे ग्रहण 28 ऑक्टोबरला दसऱ्यानंतर पौर्णिमेच्या दिवशी होणार आहे. हे चंद्रग्रहण खूप खास असणार आहे, कारण संपूर्ण वर्षभरात होणाऱ्या सर्व ग्रहणांमध्ये हे एकमेव ग्रहण असेल, जे भारतात दिसेल आणि त्याचा सुतक कालावधी वैध असेल. वर्षातील दुसरे चंद्रग्रहण हे खंडग्रास चंद्रग्रहण असेल, जे मेष आणि अश्विनी नक्षत्रात होईल. या चंद्रग्रहणाला आंशिक चंद्रग्रहण असेही म्हणतात.

वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण रविवार, 29 ऑक्टोबर 2023 रोजी होणार आहे. या ग्रहणाची वेळ पहाटे 01.06 वाजता सुरू होऊन पहाटे 02.22 वाजता संपेल. 28 ऑक्टोबर रोजी दुपारी 02:52 वाजता सुरू होणार्‍या चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी 9 तास आधी सुरू होत असल्याने, चंद्रग्रहणाच्या सुतक काळात पूजेसह सर्व शुभ कार्ये करणे निषिद्ध असतील. या काळात मंदिरांचे दरवाजे बंद राहतील. स्थानिक ग्रहणाचा कालावधी एक तास, सोळा मिनिटे आणि सोळा सेकंद असेल. भारतातील या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी 1 तास 16 मिनिटे असेल. हे चंद्रग्रहण भारताव्यतिरिक्त इतर देशांमध्येही दिसेल. तसेच हे चंद्रग्रहण काही राशींसाठी फलदायी देखील असेल.

हिंदू धर्मानुसार, हे आंशिक चंद्रग्रहण असेल, जे भारतात दिसेल. ते संपल्यानंतर स्नान करूनच परमेश्वराला स्पर्श करा. हे चंद्रग्रहण खास असेल कारण राहु केतू ऑक्टोबरमध्ये आपली हालचाल बदलतील, ज्यामुळे अनेकांवर त्याचा प्रभाव दिसून येणार आहे.

या काळात मेष, वृषभ आणि कर्क राशीच्या लोकांना काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. चंद्रग्रहणाच्या दिवशी कोणतेही काम किंवा निर्णय घेताना घाई करू नका. याचा तुम्हला भविष्यात त्रास होऊ शकतो. या काळात शत्रूंमुळे तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. या काळात तुमची तब्येतही बिघडू शकते. आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.

याशिवाय कुंभ, मकर, मिथुन, तूळ, वृश्चिक, धनु आणि मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ राहील. करिअर आणि व्यवसायात प्रगती, अचानक आर्थिक लाभासोबत कामाच्या ठिकाणी मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे. कन्या आणि सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ संमिश्र परिणाम देईल.

चंद्रग्रहण म्हणजे काय ?

चंद्रग्रहणादरम्यान, पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना चंद्र आणि सूर्य यांच्यामध्ये येते. या काळात चंद्र पृथ्वीच्या सावलीपासून पूर्णपणे लपलेला असतो. संपूर्ण चंद्रग्रहण दरम्यान, सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एकमेकांच्या अगदी एका रेषेत असतात. या काळात, जेव्हा आपण पृथ्वीवरून चंद्र पाहतो तेव्हा तो आपल्याला काळा दिसतो त्याला चंद्रग्रहण असे म्हणतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe